लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु.: टरबुज, खरबूज फळपिकांच्या लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने धनज बु. परिसरात टरबूज लागवडीला शेतकºयांनी सुरुवात केली आहे. यंदा धनज बु. परिसरात टरबुजाच्या लागवडीत लक्षणीय वाढ होणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.साधारणत: डिसेंबरच्या अखेरपासून टरबूज, खरबूजासह काकडी या पिकांच्या लागवडीला शेतकरी सुरुवात करतात. जवळपास तीन महिन्यांच्या काळात ही पिके काढणीवर येतात. आता या पिकांच्या लागवडीचा काळ सुरू झाला असल्याने धनज बु. परिसरातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकºयांनी टरबुजाच्या लागवडीला सुरूवात केली आहे. यासाठी मल्चिंग पद्धतीने या पिकाच्या लागवडीवर शेतकºयांनी भर दिला असून, यासाठी आधी जमिनीची मशागत करून सºया पाडल्या आहेत. गतवर्षीच्या दमदार पावसामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकºयांना या पिकांचे सिंचन करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळेच परिसरात यंदा टरबुजाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. लागवडीसाठी स्वत:च तयार केली रोपेधनज बु. परिसरातील शेतकºयांचा टरबुज पिकाच्या लागवडीकडे कल वाढत असताना अनेक शेतकरी स्वत:च टरबुजाची रोपे तयार करीत आहेत. कॅरेटमध्ये सुपिक माती टाकून बियांची पेरणी करीत शेतकºयांनी रोपांची निर्मिती केली असून, रोपे लागवडी योग्य झाल्यानंतरच शेतकरी मल्चिंग पद्धतीने या रोपांची लागवड करीत आहेत.
टरबूज लागवडीला सुरुवात; मल्चिंग पद्धतीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 5:01 PM
Watermelon cultivation: मल्चिंग पद्धतीने या पिकाच्या लागवडीवर शेतकºयांनी भर दिला आहे.
ठळक मुद्दे डिसेंबरच्या अखेरपासून टरबूज, खरबूज लागवडीला शेतकरी सुरुवात करतात. तीन महिन्यांच्या काळात ही पिके काढणीवर येतात. यंदा टरबुजाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.