कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने खाटा, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, औषधे अशा सर्वच स्तरावर तुटवडा निर्माण झाला. यंत्रणा अपुरी पडत असल्याने रुग्णांची ससेहोलपट आणि प्रशासन यंत्रणेची तारेवरची कसरत झाली. यातून धडा घेऊन जिल्ह्यात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात स्त्री रुग्णालयात १ हजार ४०० एलपीएम क्षमतेचे ३ ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आले आहेत. शिवाय उपजिल्हा रुग्णालयातही ६०० एलपीएम क्षमतेचा ऑक्सिजन प्लांटही तयारच आहे. तिसरी लाट रोखायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या जिल्ह्यात २९.२० टक्के लोकांचा पहिला डोस तर २८.१० टक्के लोकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. दररोज किमान २० हजार लाख नागरिकांचे लक्ष्य समोर ठेवून यंत्रणेला काम करावे लागणार आहे.
--------
पहिली लाट
एकूण रुग्ण -८९३४
बरे झालेले -८७७४
मृत्यू -१६०
------
दुसरी लाट
एकूण रुग्ण -३२,६६७
बरे झालेले -३२,११५
मृत्यू -४६२
१८ वर्षांवरील ८.२१ टक्के लोकांचेच दोन्ही डोस पूर्ण
१८ वर्षांवरील एकूण लोकसंख्या : ९,९४,९५०
एकूण लसीकरण - ३,७१,९५४
पहिला डोस - २,९०,४९२
दोन्ही डोस - ८१,४६२
--------------------------------
९ सेंटर, १३३० बेड तयार
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने पुरेशी तयारी केली आहे. जिल्ह्यात ९ कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात आले असून, शासकीय रुग्णालयात १३३० बेडही ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय खासगी हॉस्पिटलची सेवा अधिग्रहित करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेसाठी पूर्ण तयारी केली आहे.
-----
लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचारासाठी १०० खाटांची स्वतंत्र सुविधा, तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथेही लहान मुलांसाठी २५ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला.
-----------------------------
३ ऑक्सिजन प्लांट तयार
१) जिल्हास्तरावर स्त्री रुग्णालयात १ हजार ४०० एलपीएम क्षमतेचे तीन ्रेऑक्सिजन प्लांट तयार आहेत. या तिन्ही ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत आहे.
२) स्त्री रुग्णालयातील दोन प्लांटची ऑक्सिजन निर्मिती क्षमता प्रत्येकी ६०० एलपीएम असून, एका ऑक्सिजन प्लांटची क्षमता २०० एलपीएम आहे.
३) उपजिल्हा रुग्णालय कारंला येथेही आरोग्य विभागाकडून ६०० एलपीएम क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली असून, हा प्लांट उपयोगासाठी सज्ज आहे.
--------------
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा कोट:
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नव्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी आहे. एक-दोन प्रकल्पांचे काम पूर्णदेखील झाले आहे. याशिवाय हॉस्पिटल व खाटांचे नियोजन, लहान मुलांसाठी विशेष सोयीसुविधांसह खाटांचे नियोजन पूर्ण झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे.
- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी