राज्यातील चार माघारलेला जिल्ह्यामध्ये वाशिम या जिल्ह्याचाही समावेश असून, वाशिम जिल्ह्यातील सर्व दृष्टीने माघारलेला मानोरा हा तालुका आहे. तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख प्रशासकीय कार्यालयाचे बहुतांश कार्यालय प्रमुख मागील अनेक महिन्यांपासून प्रभारींच्या खांद्यावर आहे. याचा सरळ फटका गोरगरीब, वंचित, गरजू नागरिकांवर नेहमी पडत आहे. हट्टी येथील मीरा ताराचंद राठोड यांना मानोरा पंचायत प्रशासनाला घरकुलाचा थकित हप्ता मिळण्यासाठी आत्महत्येचा दिलेल्या इशाऱ्याच्या उदाहरणावरून ही बाब समोर आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासनाकडून नियुक्तीला असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वास्तविकतेचे आणि मानवतेचे भान ठेवण्याची गरज आहे
श्याम राठोड