वाशिम: मंगरुळपीर तालुक्यात शासनाच्या श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थींना गत चार महिन्यांपासून अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी वृद्धांची दुष्काळी स्थितीत मोठी परवड सुरू असून, वृद्ध महिला, पुरुष वारंवार अनुदानासाठी बँकांच्या वाºया करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाºया ६५ व ६५ वर्षावरील व व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून ४०० प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभाथ्यार्ला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे २०० रुपये प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ४०० आणि केंद्र शासनाचे २०० रुपये मिळून प्रती महिना ६०० रुपये प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते. याच योजनेतील गट (ब)अंतंर्गत ज्या व्यक्तीचे वय ६५ व ६५ वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांच्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये ६०० प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते. शासनाच्यावतीने देण्यात येणारे हे अनुदान आता थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होत असले तरी, अद्यापही अनेक लाभार्थींचे खाते व आधार क्रमांक शासनाकडे प्राप्त न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने तहसील कार्यालयांद्वारे अशा लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा करण्यात येत आहे. तथापि, गत चार महिन्यांपासून मंगरुळपीर तालुक्यातील श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थीना अनुदानच मिळालेले नाही. तालुक्यात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ९ हजार ८५६ आहे. या सर्व लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर अदा करण्यात येते; परंतु एकूण १७ हजार निराधारांपैकी श्रावण बाळ योजनेच्या ९८५६ लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कमच चार महिन्यांपासून बँकांत जमा झाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांची मोठी परवड होत असून, दरदिवशी शेकडो लाभार्थी ब्विविध बँका आणि तहसील कार्यालयात अनुदानासाठी चकरा मारत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रखरखत्या उन्हात हे वृद्ध लाभार्थी शासनाच्या अनुदानासाठी वारंवार अधिकाºयांकडे चौकशी करीत असताना त्यांचे समाधान करण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे या वृद्ध निराधारांवर दुष्काळी स्थितीत उपासमारीची पाळी आली आहे.
मंगरुळपीर तालुक्यात अनुदानाअभावी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:47 PM
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यात शासनाच्या श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थींना गत चार महिन्यांपासून अनुदानच मिळालेले नाही.
ठळक मुद्दे६५ व ६५ वर्षावरील व व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून ४०० प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते. गत चार महिन्यांपासून मंगरुळपीर तालुक्यातील श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थीना अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे या वृद्ध निराधारांवर दुष्काळी स्थितीत उपासमारीची पाळी आली आहे.