लाभार्थी नागरिकांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगरुळपीर नगर परिषद मार्फत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे व आम्ही अंदाजे सन २०१९ साली घरकुल मंजूर झालेले लाभार्थी आहोत. आमच्यापैकी काही लाभार्थीना सदर योजनेचा पहिला हप्ता अंदाजे नोव्हेंबर २०१ ९ मध्ये रु . ४०००० / - प्राप्त झालेला आहे. दुसरा हप्ता अंदाजे फेब्रुवारी २०२० मध्ये रु . ४०००० / - मिळाला परंतु तिसरा हप्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे . अनेकवेळा त्यासंबंधी नगर परिषदेला विचारणा केली असता त्यासंबंधीचा निधी आज येईल उद्या येईल अशाप्रकारे उडवाउडवीची उत्तरे आम्हाला देण्यात येत आहेत. शिवाय ८० पेक्षा अधिक लाभार्थींनी घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले असताना लाभार्थींचे निवासी अतिक्रमण नियमानुकूल न केल्याने ते घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांनी नगर परिषद, तहसील कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन सादर केले, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी उपाेषणाचा पवित्रा घेतला आहे. या उपोषणकर्त्यांमध्ये कादीरभाई, नाझिम मोहम्मद,अभिषेक दंडे, मिर्झा रशीद बेग, संजय शर्मा, मनोज इंगळे, संजय कोराणे, मोहम्मद निसार, इम्तियाज अली खान, नाझीम खान, वाहेद खान, वसिम परवेझ आदिंचा समावेश आहे.
घरकुलांना मंजुरी व निधीसाठी लाभार्थीचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:49 AM