या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या वनोजा येथील ग्रामपंचायत सदस्य गीता राठोड , कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेल्या अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका लता चौधरी, प्रमुख पाहुणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परळकर , प्रिया पावरा, योगीता गवाळे , रंजना इंगोले , सुजाता इंगोले , बनसोड यांची उपस्थिती होती. दिवसेंदिवस मुलींची संख्या घटत चालल्याचे चित्र सर्वदूर आहे. त्यामुळे मुलींची संख्या वाढावी या उद्देशाने मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे अंगणवाडी सेविका आणि गावातील गृहिणी यांच्यावतीने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .यामध्ये उपस्थित महिलांना ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ हा संदेश दिला. यावेळी कुपोषित बालकांच्या मातांना सकस आहार पालेभाज्या, कडधान्य, ड्रायफ्रूट, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील गोरगरीब मुलांना घरीच दूध कसे उपलब्ध होईल यावर जिल्ह्यात मुबलक पिकणाऱ्या सोयाबीनपासून दूध कसे तयार करायचे यावर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन वाण देण्यात आले. तसेच बेटी बचाव बेटी पढाव रांगोळी काढण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत उपस्थित महिलांना मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश देण्यात आला. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यावतीने कुपोषित बालकांच्या मातांना आपल्या बालकांना सकस आहार ड्रायफ्रुट, पालेभाज्या, कडधान्य , हे आहारामध्ये द्यावे असे मार्गदर्शन करण्यात आले . सोयाबीनपासून दुध कसे बनवावे याची सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविले , गावातील उपस्थित महिलांना हळदीकुंकू लावून वाण देण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका निशिगंधा दयाराम भगत, आशा विलास किटके, वंदना संजय महल्ले, मंदा संजय गांवडे, मीरा शामराव टोंचर,तसेच मदतनीस विशाखा सिध्दार्थ इंगोले, सुनिता अनिल राऊत ,विभा सज्जन चव्हाण, शारदा महादेव खंडारे,.वर्षा रवींद्र काळे यांची उपस्थिती होती.
वनोजा येथे “बेटी बचाव बेटी पढाव” कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:41 AM