शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:42 AM

वाशिम : ‘फेक फेसबुक’ अकाऊंटवरून परिचयातील व्यक्तीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून पैशांची मागणी करीत फसवणूक होत ...

वाशिम : ‘फेक फेसबुक’ अकाऊंटवरून परिचयातील व्यक्तीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून पैशांची मागणी करीत फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील दोन नामांकित राजकीय पदाधिकाऱ्यांना देखील मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सावध राहा, फेक फेसबुकवरून पैशांची मागणी झाल्यास पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

एकमेकांशी संपर्क साधण्याचे साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी मैत्री करण्याकडेही अनेकांचा कल असतो. मात्र, ही मैत्री कधी-कधी खूप महागात पडते तसेच मेसेंजर हॅक करून त्या मेसेंजर युझरच्या अकाऊंटवरून पैशाची मागणीही केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मध्यंतरी जिल्हा परिषद सदस्य दिलीप देशमुख यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून हॅकरने मेसेंजरच्या माध्यमातून फेसबुक मित्रांकडे पैशाची मागणी केली होती. काँग्रेसचे युवा नेते शंकर वानखेडे यांचे देखील मेसेंजर हॅक करून हॅकरने मित्रांकडे पैशाची मागणी केली होती. याप्रमाणेच इतरही काही प्रकरणे समोर आली आहेत. फेसबुकवरून पैशाची मागणी करून फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने सर्वांनी सावध होणे आवश्यक ठरत आहे. फेक प्रोफाईल बनवून देखील पैशाची मागणी होऊ शकते. तेव्हा फेसबुक, मेसेंजरचा वापर करताना अधिक सावध राहणे गरजेचे आहे. शक्यतोवर अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये किंवा एखाद्या मित्राचे मेसेंजर हॅक झाले आणि त्यावरून पैशाच्या मागणीचा संदेश आला तर सर्वप्रथम संबंधित मित्राशी फोनद्वारे संपर्क साधून पडताळणी करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

०००००००००

फेक अकाऊंट बनवून फसवणूक !

फेक अकाऊंट बनवून फसवणूक करण्याचे प्रकारही घडतात. तेव्हा अधिक सावध राहणे आवश्यक आहे. ज्यांची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली आहे. त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरून बनविलेली फेक प्रोफाईल शोधावी. ज्या मित्रांना प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली, त्यांच्याकडून फेक प्रोफाईलची लिंक (युआरएल) मागवून घ्या. त्या प्रोफाईलवर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा, तुमच्यासमोर फाइंड सपोर्ट किंवा रिपोर्ट प्रोफाईल हे ऑप्शन येतील. त्यावर क्लिक करा. प्रिटेडींग टु बी समवेअन हा पहिला ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, पुढे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. मी अ फ्रेन्डस आणि सेलिब्रिटी. त्यावरील मी ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा, फेक प्रोफाईल अकाऊंट काही वेळाने बंद होईल.

०००००००

बॉक्स

अशी घ्या काळजी !

स्वत:ची फेसबुक फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसू नये, याकरिता सेटिंगमध्ये जाऊन प्रायवसी सेटिंगवर क्लिक करा. त्यानंतर हु कॅन युवर फ्रेंड लिस्टवर जाऊन ओनली मी करा. स्वत:ची फेसबुक प्रोफाईल फोटो अनोळखी व्यक्तीने कॉपी किंवा डाऊनलोड करू नये, याकरिता सेंटिंगमध्ये जाऊन प्रोफाईल लॉगइनवर जाऊन लॉक युवर प्रोफाईल करा. अनोळखीने फ्रेंड रिक्वेस्ट करू नये, याकरिता सेटिंगमध्ये जाऊन प्रायवसी सेटिंगमधील फ्रेंड ऑफ फ्रेंड करावे. स्वत:चा फेसबुक अकाऊंट सुरक्षित ठेवण्याकरिता सेटिंगमध्ये जाऊन सिक्युरिटी ॲन्ड लॉगइनवर क्लिक करून टु फॅक्टर अथेंटिकेशन करावे. फेसबुकवरील आपला मोबाईल क्रमांक दिसू नये, याकरिता सेटिंगमधील प्रायवसी सेटिंगवर क्लिक करून हु कॅन लुक यु अप युजिंग फोन नंबर यु प्रोव्हाईडवर जाऊन ओनली मी हे ऑप्शन क्लिक करावे. यामुळे फेसबुक अकाऊंट सुरक्षित करता येईल.

000