शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

खबरदार, विनाकारण घराबाहेर पडाल तर ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:56 AM

Washim News: कारणाशिवाय कुणी घराबाहेर पडले तर प्रशासनाच्या कारवाईला आणि पाेलिसांच्या दंड्याला सामोरे यरे जावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून सुरू केली असून, प्रमुख ठिकाणी व चौकांत चोख बंदोबस्त ठेवला आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी घराबाहेर पडले तर प्रशासनाच्या कारवाईला आणि पाेलिसांच्या दंड्याला सामोरे यरे जावे लागणार आहे.राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून कडक निर्बंध लागू केले आहेत. १ मे राेजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार असून, जिल्ह्यात या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गत काही दिवसांपासून दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी होती. आता पूर्णवेळ कडक निर्बंध राहणार असून, अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवली जाणार असून, चोरी-छुपे दुकानांत खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.  अंमलबजावणी म्हणून प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

जिल्ह्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने सुरू करण्यास मनाई आहे. व्यापारी, नागरिकांनी संचारबंदीच्या नियमाचे पालन करून कोरोनाविरूद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.- शण्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम

संचारबंदी नियमाची अंमलबजावणी म्हणून प्रमुख ठिकाणी व चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण कुणी रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम 

टॅग्स :washimवाशिम