शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

भामदेवीत नावानिशी लागणार अडीच हजार वृक्ष!

By admin | Published: June 28, 2016 2:41 AM

वाशिम जिल्हाधिका-यांची संकल्पना; अधिकांश फळांच्या वृक्षांचा समावेश.

सुनील काकडे / वाशिममुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त दोन कोटी रुपयांतून भामदेवी (ता. कारंजा) या गावात विविध विकासात्मक कामे हाती घेण्यात आली असून, या गावाची सध्या सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या १ जुलै रोजी भामदेवीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावानिशी तब्बल अडीच हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वत: जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विशेष पुढाकार घेत आहेत. जिल्हा स्तरावरील किमान एका गावाचा ह्यमॉडेलह्ण म्हणून सर्वांगीण विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. वाशिमचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यासाठी भामदेवी (ता. कारंजा) या गावची निवड केली असून, या अंतर्गत आतापर्यंत गावातील दोन तलावांचे खोलीकरण करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामांनाही येथे विशेष प्राधान्य देण्यात आले. याशिवाय मार्च २0१७ पर्यंत शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, दिवाबत्ती आदींसंदर्भातील सोयी-सुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष पुरविले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ह्यलोकमतह्णला दिली. जिल्हाधिकार्‍यांच्याच संकल्पनेतून येत्या १ जुलै रोजी भामदेवी येथे कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावाने वृक्ष लावण्यात येणार आहे. त्यात कडूनिंबाच्या ४00 झाडांसह जांभूळ १00, फणस २५, पिंपळ २00, वटवृक्ष २00, आंबा २00, बेल १00, सीताफळ २00, रामफळ १00, खैर १00, सागवान २00, मोह ५0, पापडा १00, रक्तचंदन २५, कवट १00, चिंच १00, आवळा १00, सीसम ५0 आणि कडू बादाम ५0, अशा विविध वृक्षांचा समावेश आहे. दरम्यान, या उपक्रमाबाबत भामदेवीमधील ग्रामस्थांमध्ये उत्सुकता असून, लोकसहभागातून खड्डेदेखील खोदण्यात आले आहेत.