कारंजालाड : स्थानिक काजी प्लॉट येथील रहिवासी प्रा.ए.एस.शेख यांच्या घराचे दार अज्ञात चोरट्यांनी दिवसा तोडून घरातील नगदी रूपये, सोने, चांदी असा एकूण ३७ हजार रूपयांचा माल लंपास केला.ही घटना २९ मे रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, येथील कि.न. महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा.शेख हे कुटुंबियांसह नातेवाईकांच्या लग्नासाठी २९ मे रोजी दिग्रस येथे गेले होते. या बाबीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बेडरूमचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेल्या रोख २२ हजार रूपये व सोने, चांदी आदीसह एकूण ३७ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला. प्रा.शेख कुटुंबीयांसह रात्री ११ वाजता दिग्रसवरुन परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याची बाब उघडकीस आली.त्यानंतर या घटनेची फिर्याद प्रा.शेख यांनी कारंजा पोलिसस्टेशनमध्ये दाखल केली. त्यावरून कारंजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध कलम ४५३, ३८0 भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
भरदिवसा घरफोडी
By admin | Published: May 31, 2014 12:16 AM