लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा तालुक्यातील भामदेवी येथे गतवर्षी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन प्रत्येक व्यक्तीने एक या प्रमाणे एकूण २५०० रोपांची लागवड केली. या रोपांचा मुलांप्रमाणे सांभाळ केल्याने शासकीय मालकीच्या जमिनीवर ही रोपे आता मोठ्या दिमाखात डोलत आहेत.भामदेवी येथील शासकीय मालकीच्या साडेसहा हेक्टर जमिनीवर प्रशासन व ग्रामस्थांच्या एकजुटीतून लागवड केलेल्या वृक्षांचे ९५ टक्के जतन झाल्याचे दिसून येते. गतवर्षी वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान १ जुलै २०१६ रोजी भामदेवी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रत्येक व्यक्तीने एक याप्रमाणे २५०० रोपांची लागवड केली होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून झालेल्या या वृक्षारोपणाचा यावर्षी १ जुलैला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने केक कापून पहिला वाढदिवसही साजरा केला होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जिल्हाधिकाºयांना मिळालेल्या दोन कोटी रुपये विशेष निधीतून भामदेवी येथे विकास कामे सुरू आहेत. यापैकीच एक असलेल्या शासकीय मालकीच्या साडेसहा हेक्टर जमिनीवर समतल चर खोदण्यात आले. या जमिनीवर गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या नावाचे झाड लावले. येथे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी स्वत:चे नावे झाड लावलेले आहे. यावर्षीदेखील अडीच हजार रोपांचे संवर्धन करण्यासाठी गावकºयांची धडपड सुरू आहे.
वृक्षांचा ‘मुलां’प्रमाणे सांभाळ करणारे असेही भामदेवीवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:38 AM
वाशिम : कारंजा तालुक्यातील भामदेवी येथे गतवर्षी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन प्रत्येक व्यक्तीने एक या प्रमाणे एकूण २५०० रोपांची लागवड केली. या रोपांचा मुलांप्रमाणे सांभाळ केल्याने शासकीय मालकीच्या जमिनीवर ही रोपे आता मोठ्या दिमाखात डोलत आहेत.
ठळक मुद्देवृक्ष जगविण्याची शपथग्रामस्थांची एकजूट२५०० रोपांची लागवड केली होती लागवड