- संतोष वानखडेवाशिम - काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून विदर्भात प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.१५ वाजता वाशीमपासून जवळच असलेल्या जांभरुण परांडे येथील मनिष मंत्री फार्म हाऊस येथून यात्रेला सुरुवात झाली.
खासदार राहुल गांधी यांच्या नेनृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबर रोजी तेलंगणातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात दाखल झाली होती. नांदेड, हिंगोली असा पायदळ प्रवास करीत ही पदयात्रा नवव्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता विदर्भातील वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला. १६ नोव्हेंबर रोजी जांभरुण परांडे येथून यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. सावरगाव बर्डे, झोडगा, अमानी मार्गे ही पदयात्रा मालेगाव शहरात पोहचणार आहे. येथे दुपारचे भोजन व विश्रांती घेतल्यानंतर दुपारी ३ वाजता मालेगाव येथून पदयात्रा मेडशीकडे मार्गस्थ होणार असून, सायंकाळी ५.३० वाजता मेडशी येथे कॉर्नर सभा होणार आहे . त्यानंतर अकोला जिल्ह्याकडे रवाना होईल .