................
पीडित व्यक्तींच्या पुनर्वसनाची मागणी
वाशिम : ॲट्रॉसिटी पीडित व्यक्तींना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी द्यावी, त्यांचे पुनर्वसन करावे, आदी मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सहसचिव पी.एस. खंदारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.
................
कारवाई थंडावली, ‘मास्क’चा वापर घटला
वाशिम : गत काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झालेली आहे. यामुळे मध्यंतरी मास्क वापरास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरू झालेली कारवाई थंडावली आहे. यामुळे मास्कचा वापर घटल्याचे दिसत आहे.
.................
उपकेंद्रांच्या कामांना गती देण्याची मागणी
वाशिम : सेनगाव (जि. हिंगोली) येथील १३२ के.व्ही. पॉवरहाऊसमधून विद्युत प्रवाह घेण्यासाठी लाइन टाकण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने दोन विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली आहेत. कामांना गती देऊन ती पूर्ण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
.............
मुख्य महामार्गावर वाहतूक विस्कळीत
वाशिम : शहरातून गेलेल्या महामार्गाच्या कडेला बसून गॅस शेगडी, खेळणी आदी साहित्य विक्रीचा व्यवसाय केला जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, शहर वाहतूक विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी धनंजय शिंदे यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केली.
.................
रात्रगस्तीमुळे चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रण
वाशिम : रात्री होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रण मिळवून चोरट्यांवर वचक बसविण्याकरिता पोलीस प्रशासन चोख कर्तव्य बजावत आहे. शहरात रात्री ८ वाहनांद्वारे गस्त घातली जात आहे.
.............
नियमाचे पालन करण्याचे आवाहन
जऊळका रेल्वे : कोरोनापासून बचावासाठी शासनाने आखून दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:चे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.
..................
अवैध रेती उपशावर कारवाईच्या सूचना
वाशिम : तालुक्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. असे असताना चोरट्या मार्गाने अवैध रेती उपसा सुरूच आहे. याप्रकरणी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्या.
.............
प्रवासी वाहनांमध्ये नियमांचे उल्लंघन
वाशिम : शहरातील पुसद नाका, हिंगोली नाका, रिसोड नाका येथून विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. ही वाहने खचाखच भरून जात असून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी प्रमोद राठोड यांनी सोमवारी केली.
...............
‘त्या’ प्रकरणाच्या तपासाची मागणी
वाशिम : गतवर्षी लॉकडाऊन काळात हैद्राबादच्या कोल्ड स्टोरेजमध्ये संत्रा साठवून ठेवला होता. मात्र, तो संबंधित दलालाने परस्पर विकला. याप्रकरणी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करूनही न्याय मिळालेला नाही. प्रकरणाचा तपास गतीने व्हावा, अशी मागणी शेतकरी संतोष केळे यांनी केली.
..............
डिझेलचे दर वाढल्याने नागरिक हैराण
वाशिम : पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून ऑटोचालक, मालवाहू वाहनधारक आणि कृषीमालाची ने-आण करणारे वाहनचालक अडचणीत सापडले आहेत.