कारंजा (लाड) : कोरेगाव भीमा प्रकरणानंतर दलित राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाकडे दलित व बहुजन कार्यकर्त्यांचा ओढा वाढला आहे. संपूर्ण बहुजन समाज आज जागरूक झालेला असुन ,जागरूक समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी १८ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्राम मनभा येथे आयोजित जाहिर प्रवेश सभेदरम्यान केले.
भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये पक्षनिरक्षक एस.बी.खंडारे,डॉ.नरेश इंगळे,विजय मनवार,नगराध्यक्ष शेषराव ढोके,राजाभाऊ चव्हाण,न.प.गटनेता व शिक्षण सभापती फिरोज शेकुवाले,न.प.उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पुवाले, तालुकाध्यक्ष भारत भगत,नियोजन सभापती एजाज खान, जिल्हा प्रवक्ता हमीद शेख, शहराध्यक्ष देवराव कटके, युवा आघाडी तालुकाध्यक्ष सचिन खांडेकर आदि प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बसपाचे बंडू इंगोले,रमेश नखाले, दीपक वानखड़े अॅड.भारत सावळे आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्ता सह भारिप बहुजन महासंघ मध्ये जाहिर प्रवेश केला . भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर व वाशीम जिल्हाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारिप बमसं मध्ये प्रवेश करीत असल्याचे मत उपरोक्त मान्यवरांनी व्यक्त केले. या प्रसंगी नईम भाई मनभा यांनी सुद्धा प्रवेश केला. आपल्या मार्गदर्शनात पुंजानी पुढे म्हणाले की समाजातील सर्व बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हा मुख्य संकल्प असून त्या दिशेने भारिप बहुजन महासंघ वाटचाल करीत आहे. बहुजन समाजाने एकसंघ होऊन प्रस्थापित सत्तेला हद्दपार करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. दरम्यान बसपाला रामराम ठोकुन भारिप बमसं मध्ये प्रवेश करणारे बंदु इंगोले, रमेश नाखले व दीपक वानखड़े यांच्यासह सर्व प्रवेश करणाºया मान्यवरांचा मो. युसूफ पुंजानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बंडू इंगोले यानी भारिप बहुजन महासंघात प्रवेश करण्याचा उद्देश विशद केला. यावेळी पं.स.सदस्य प्रमोद लड़े, अॅड.धम्मानंद देवले, के.जी.ताटके, आसिफ कुरेशी,सरपंच वाहिद मिर्जा,दिलीप शेजव,संतोष शेजव,देवेंद्र कराळे,मोहन कदम,मधुकर वनारसे, देवराव सोनटक्के, अनिल राठोड,अशोक पाटिल टाके, गजानन ढेंगड़े, बबन वानखड़े,वसंतराव राठोड,विश्वनाथ आडोले,गणेश बागडे,दिगंबर पाडेन, प्रभुदास पाडेन,निर्मलाबाई इंगोले,मधुकर बोलके,सुनील रामटेके,संजय मनवर,माया निचड, रजनी धाकतोड़े,राजेंद्र रंगारी,संजय मनवर,विष्णु पाटिल,महादेवराव खडसे,भगवान जाधव,दुर्योधन मनवर सह शेकडो भारिप बमसं पदाधिकरी,कार्यकर्ते यांच्यासह बहुसंख्य आंबेडकरी विचारसरणीचे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन भारिप जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले तर आभार ग्रा.पं. सदस्य सैय्यद आझम यांनी मानले.