वाशिम: शासनाने २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने राबविण्यास मान्यता दिली असून, सदर योजनेतंर्गत पश्चिम वऱ्हाडात ४०० हेक्टरहूून अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.सन २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येत आहे. योजनेत भाग घेणाºया शेतकºयांना शासन निर्णयानुसार तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार असून लाभार्थी शेतकºयाने दुसºया व तिसºया वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९० टक्के, तर कोरडवाहू झाडांसाठी ८० टक्के ठेवणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत पश्चिम वºहाडात कृषी विभागाकडून फळझाड लागवडीसाठी तांत्रिक प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यात आल्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत पश्चिम वºहाडात ४०० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात शेतकºयांनी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यात वाशिम जिल्ह्यात ९४ शेतकºयांनी ९३ हेक्टर क्षेत्रावर, तर बुलडाणा जिल्ह्यात २९९ शेतकºयांनी ३०२.९७ हेक्टर क्षेत्रावर केलेल्या लागवडीचा समावेश आहे. या योजनेला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता शेतकºयांचा योजनेला प्रतिसाद लाभत आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: पश्चिम वऱ्हाडात ४०० हेक्टरवर लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 3:26 PM