वाशिम शहरामध्ये फिरण्यासाठी, बसण्यासाठी काेणत्याच प्रकारची व्यवस्था नाही. लाेकसहभागातून नागरिकांनी नारायणबाबा तलावातील गाळ काढण्याचे कार्य हाती घेतले. ही माहिती भावना गवळी यांना शिवसैनिकांकडून कळाल्याने त्यांनीही ३.५० काेटी निधी दिला. या निधीतून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून या कामास सुरुवातही झाल्याचे दिसून येत आहे. या नारायणबाबा तलावाचे लवकरच रूपडे बदलणार आहे.
--------------
तलावाजवळ या राहतील व्यवस्था
नारायणबाबा तलावाजवळ काही दिवसांमध्येच सुंदर असे तलाव नागरिकांसाठी रमणीय ठिकाण तयार होणार आहे. यामध्ये विविध रंगांचे फवारे, तळ्याच्या काठावर स्ट्रीट लाईट, पेव्हर, बसण्यासाठी बाकडे अशा विविध सुविधेसह नारायणबाबा तलावाच्या साैंदर्यीकरणाचे काम पूर्ण होणार आहे आणि वाशिमकरांना फिरण्यासाठी व बसण्याची सुंदर ठिकाण तयार होणार असल्याचे दिसून येत आहे.
---------
काही युवकांसह समाजसेवकांनी नारायणबाबा तलावातील गाळ काढण्याचे कार्य हाती घेतल्याची माहिती शिवसैनिकांनी दिली. त्यावरून साैंदर्यीकरणाकरिता आपण पुढाकार घेतला.
- खासदार भावना गवळी, यवतमाळ-वाशिम मतदारसंघ