ऑनलाइन लोकमतवाशिम : ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १७ व १८ मे रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते गुरुवारी नविन तीन केंद्राचे भूमिपूजन केल्या जाणार आहे. १७ मे रोजी दुपारी ४.३० वाजता हिंगोली येथून हेलिकॉप्टरने मालेगाव तालुक्यातील शिरपूर खंडाळाकडे येथे येवून सायंकाळी ५.१५ वाजता शिरपूर खंडाळा येथील ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण तर सायंकाळी ६.३० वाजता वाशिम येथील एस. एम. सी. स्कूलमध्ये आयोजित संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. रात्री ८ वाजता वाशिम येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहणार आहे. १८ मे रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना अंतर्गत बेलमंडल (ता. कारंजा), कुपटा (ता. मानोरा), आसेगाव (ता. रिसोड) येथे मंजूर ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांचे भूमिपूजननिमित्त महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय प्रांगणात जनतेच्या तक्रारी स्वीकारून निवारणासाठी राखीव. यामध्ये महावितरण, महापारेषणसह राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. तर दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात लोकप्रतिनिधींच्या समवेत बैठक व दुपारी ४.३० वाजता वाशिम येथून पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोलाकडे प्रयाण करतील.