या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य दिलीप मोहनावाले होते. सचिन डोफेकर, जि. प. सदस्य दौलतराव इंगोले, पांडुरंग कोठाळे यांच्या उपस्थितीत श्रीकांत देशपांडे यांच्या पत्रावर राज्य शासनाकडून मंगरुळपीर तालुक्यात विविध ठिकाणी निधी दिला. तऱ्हाळा येथे १५ लक्ष रुपयांचे सामाजिक सभागृह बांधकामास मान्यताप्राप्त झाली होती. किशोर देशमुख व पांडुरंग कोठाळे यांच्या आग्रहाने भवानी माता मंदिरामागे सामाजिक सभागृहाची आवश्यकता पाहता मंजूर केले होते. या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा व मान्यवरांचा सत्कार शासनाच्या कोविड १९ च्या आदेशाचे पालन करून अल्प कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरुवात झाली. कार्यक्रमाला विवेक महल्ले, दिलीपराव भगत, गणेश म्हैसने, रियजुला खान नायजुला खान, अजय मोहाळे, सागर म्हैसने, बाळूभाऊ गावंडे, गजानन आसरे, नीलेश देशमुख, संतोष गावंडे, प्रशांत गावंडे, राजकुमार गावंडे, विलास बाईस्कर, चेतन गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कामाचे कंत्राटदार चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर देशमुख यांनी केले तर प्रास्तविक पांडुरंग कोठाळे यांनी केले. तर आभार सागर म्हैसने यांनी मानले (वा. प्र.)
सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:38 AM