याप्रसंगी जनविकास आघाडीचे अध्यक्ष चैतन्यभय्या अनंतराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला रिसोड नगराध्यक्ष विजयमाला कृष्णा आसनकर, सदस्य संगीता मोरे, नारायण गायकवाड, अॅड. कृष्णा महाराज आसनकर आदींची उपस्थिती होती. रिसोड शहरातील ८५ लाख रुपयेची पाईपलाईन प्रभागातील विविध ठिकाणी १ कोटी तसेच तेराव्या वित्त आयोगातून २ कोटी रूपयांची कामे सुरू झाली आहेत. प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी, रस्त्याच्या समस्या उद्भवल्या होत्या. ते लक्षात घेता व प्रभागांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांनी निवडणुकीच्या वेळी मतदारांना कामे करण्याचे आश्वासन दिले होते. ती कामे आता पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी जनविकास आघाडीच्या नगरसेवकांनी करून दाखवली असल्याचे चैतन्यभय्या देशमुख यांनी सांगितले. नगराध्यक्ष आसनकर यांनी सांगितले की प्रभागातील नागरिकांच्या कोणत्याही समस्या असतील तर नगर परिषदमध्ये येऊन माहिती द्यावी. समस्या मिटण्यासाठी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नरत असल्याचे न.प. सदस्य नारायण गायकवाड आणि संगीता मोरे यांनी सांगितले.
विविध विकासकामांचे भूमिपुजन संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:18 AM