संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या शिबिरात राज्य उपाध्यक्ष भास्कराव बेंगाळ, भागवतराव गोटे, शिवाजीराव वाटणे, रिसोड तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, मालेगाव तालुकाध्यक्ष नागेश इंगोले, कारंजा तालुकाध्यक्ष अंकुश पाथरकर, मानोराचे हरिभाऊ ठाकरे, धनंजय बोरकर हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील शिंदे यांची प्रमुख युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर बोरकर रिसोड शहराध्यक्ष विकास झुंगरे यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या सत्रात जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी प्रास्ताविक केले. मार्गदर्शक म्हणून लाभलेले पंकज मांजरे पाटील यांनी 'लसूण लागवडीतून समृद्धी' या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक संजय मालोकर यांनी किसान क्रेडिट कार्ड व त्याचे महत्तत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य विजयराव तुरूकमाणे यांनी शेतकरी समाज व शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले.