लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालेगाव तालुक्यातील खिर्डा येथील अशोक चहादू वैद्य यांच्याकडे वीज मीटर नसतानाच महावितरणने जुलै महिन्याचे देयक दिले आहे. या अफलातून प्रकारामुळे वैद्य यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.वैद्य यांनी वीज मीटर मिळावे, यासाठी किन्हीराजा येथील महावि तरणच्या कार्यालयात २0 एप्रिल २0१७ रोजी अर्ज सादर केला होता. यावेळी कोटेशनदेखील भरण्यात आले. अद्याप वीज मीटर बसविण्यात आले नाही. तथापि, महावितरणतर्फे वैद्य यांना वीज देयक देण्यात आले आहे. या प्रकाराची तक्रार महावितरणकडे करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात किन्हीराजा उपकेंद्राचे अभियंता बी.आर. लादे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, संबंधित ग्राहकाचा तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, याची माहिती घेतली जाईल. वीज मीटर नसल्याने संबंधित ग्राहकाकडून देयक आकारले जाणार नसून ते वजा केले जाईल.
वीज मीटर नसताना आकारले बिल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:05 AM
वाशिम : मालेगाव तालुक्यातील खिर्डा येथील अशोक चहादू वैद्य यांच्याकडे वीज मीटर नसतानाच महावितरणने जुलै महिन्याचे देयक दिले आहे. या अफलातून प्रकारामुळे वैद्य यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
ठळक मुद्देखिर्डा येथील प्रकार महावितरणचा अजब कारभार