................
शिरपूरच्या विकासाला गती देण्याची मागणी
वाशिम : जैनांची काशी, संतभूमी, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या शिरपूर जैन गावाचा अपेक्षित विकास अद्याप झालेला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, विकासाला गती देण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.
.................
किन्हीराजा परिसरात विजेचा लपंडाव
वाशिम : किन्हीराजा परिसरातील गावांमध्ये विद्युत पुरवठा अधूनमधून खंडित होत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.
..............
मानधनात वाढ करण्याची मागणी
वाशिम : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर निराधार, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिक संघाने मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.
.............
पोस्ट ऑफिस चौकात दुभाजकाची गरज
वाशिम : वाढती वाहतूक लक्षात घेता स्थानिक पोस्ट ऑफिस चौक परिसरात रस्ता दुभाजक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाला बुधवारी नागरिकांनी निवेदन दिले.
...............
धूम्रपान बंदी कायद्याचे उल्लंघन
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असली तरी शहरात त्याचे उल्लंघन होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग तथा पोलीस प्रशासनाने याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी दीपक आंबेकर यांनी केली.
.................
महामार्गावर मोकाट गुरांचा ठिय्या
मालेगाव : वाशिम- अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मालेगाव शहरातील मुख्य चौकात मोकाट गुरे दिवस- दिवस ठिय्या देत आहेत. यामुळे वाहतूक प्रभावित होत असून, हा प्रश्न स्थानिक प्रशासनाने निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.