नाना देवळे/मंगरूळपीर (वाशिम)शासकीय कर्मचार्यांच्या कार्यालयातील आवागमनाची नोंद घेण्यासाठी आवश्यक असलेले बायोमेट्रिक यंत्र मंगरुळपीर पंचायत समितीमधून सात वर्षांपासून गायब झाले असून, कर्मचार्यांच्या येण्या-जाण्यावर कोणताही अंकुश असल्याचे दिसत नाही. त्यामुळे सर्वसाधारण लोकांच्या कामांनाही मोठा विलंब लागत आहे.मंगरुळपीर पंचायत समिती कार्यालयात तालुकाभरातील लोक विविध कामानिमित्त येत असतात. तथापि, कार्यालयीन वेळेमध्ये कर्मचारी कार्यालयात उपस्थित दिसतीलच या शाश्वती कोणालाही नसते. कर्मचार्यांच्या अनुपस्थितीमुळे पैसे खचरून कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयात येणार्या ग्रामीण भागातील लोकांचे काम तर होत नाहीच शिवाय त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यंत्रात बिघाड दूर करून फार तर तीन महिन्यांच्या काळात हे यंत्र पूर्ववत सुरू करणे अपेक्षित आणि आवश्यक होते; परंतु यंत्रात बिघाड होण्यास तब्बल सात वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी, पंचायत समितीमधील हे यंत्र पुन्हा जागेवर लागले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी के वेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सद्य:स्थितीत बायोमेट्रिक यंत्रात बिघाड झालेला असून, त्याची दुरुस्ती त्वरित झाली नाही, तर जिल्हास्तरीय अधिकार्यांना विचारून नवे यंत्र बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
बायोमेट्रिक यंत्र सात वर्षांपासून बंद
By admin | Published: October 29, 2014 1:27 AM