- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लिप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना २९ दिवसाचा असतो. लिप वर्ष चार वर्षातून एकदा येत असल्याने यादिवशी जन्म घेणाऱ्या बालकांचा वाढदिवस हा चार वर्षानंतर एकदा येतो. या दिवशी जन्माला आलेले अनेक जण चार वर्षानंतर वाढदिवस साजरा करतात तर काही दरवर्षी २९ तारखेच्या अगोदर एक दिवस किंवा नंतर एक दिवस वाढदिवस साजरा करतात. २९ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हयात किती बालकांचा जन्म झाला याची माहिती घेतली असता १२ बालकांचा जन्म झाला. या सर्व बालकांचा वाढदिवस हा चार वर्षानंतर एकदा येणार आहे.यंदाचे २०२० हे लीप वर्ष आहे. वर्षातील फेब्रुवारी महिन्याव्यतिरिक्त अन्य महिने ३० किंवा ३१ दिवसाचे असतात. फेब्रूवारी महिना २८ दिवसाचा असतो, परंतु लीप वर्ष आले असता एक दिवस वाढून तो २९ दिवसाचा होतो. या दोन दिवशी ज्यांचा जन्म असतो ते त्यांचा आनदं व्दिगुणीत करणारा ‘लीप डे ’ म्हणूनही साजरा करतात. या दिवशी जन्मलेल्यांचा वाढदिवस तब्बल चार वर्षाने करावा लागतो, पळवाट म्हणून आदल्या किंवा दुसºया दिवशी अनेक जण वाढदिवस साजरा करतात. लिप इयरमध्ये जन्म घेणाºया मुलांना ‘लिपलिंग्ज’ किंवा ‘लिपर्स’ म्हटले जाते. जगभरात ५० लाख लिपर्स असल्याची माहिती आहे.जिल्हयात २९ फेब्रुवारी २०२० रोजी जन्म घेतलेल्यांमध्ये मंगरुळपीर शहरातील ग्रामीण रुग्णालयात दोन बालिकेचा जन्म झाला. यामध्ये मानोरा तालुक्यातील धामणी येथील सुमित्रा अशोक मोरकर, उमरी येथील लक्ष्मी नितीन गिरे यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील रुग्णालयात उर्मिला गणेश गाडे यांना व मानोरा तालुक्यातील दापुरा येथील अनिता नंदू पवार यांना मुलगा झाला.कारंजा येथील शासकीय दवाखान्यात स्वाती भोकरे, कल्पना वरठी यांना मुलगा तर दिव्या कांबळे यांना मुलगी झाली. वाशिम येथील खासगी दवाखान्यात नितिका अजय सुराणा यांना मुलगी, दमयंती राम पिंसे आर्मिजवाला यांना मुलगी , परविन शेख अमिन यांना मुलगा झाला. रिसोड येथे मंगल किरण ताकतोडे रा.गणेशपूर यांना मुलगा तर कल्पना नामदेव सावंत रा. वरखेडा यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती प्राप्त झाली.
२९ फेब्रूवारीला जन्म झालेली मुले/मुलीवाशिम : २ मुले, एक मुलगीमंगरुळपीर : २ मुलीमालेगाव : १ मुलगाकारंजा : २ मुले, एक मुलगीमानोरा : १ मुलगारिसोड : १ मुलगा, १ मुलगी