वाशिम: वाशिम शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यास नगरपालिका प्रशासन कमी पडत आहे. यामुळे नागरिकांना हाेत असल्याच्या निषेधार्थ आमदार लखन मलिक यांच्या मार्गदर्शनात १६ जुलै राेजी खड्ड्यांचे पूजन करून शहरात आंदाेलन करण्यात आले.
वाशिम नगरपालिकेच्या विरोधात पुकारलेल्या या आंदाेलनात आमदार लखन मलिक तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, नगर परिषद सदस्य अमित मानकर, नगर परिषद सदस्य भीमकुमार जीवनानी, शहर सरचिटणीस, शहर उपाध्यक्ष रामभाऊ हेगडे यांच्या नेतृत्वात वाशिम शहरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य दिगंबर खोरणे, शहर सरचिटणीस गणेश खंडाळकर, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोयर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख, शहर सरचिटणीस सुनील तापडिया, जीवन अग्रवाल, युवा मोर्चा जिल्हा सचिव कैलास मुगवानकर, दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष विश्वास ब्रम्हेकर, गणेश पाठक, नीलेश जैस्वाल, पवन जोगदंड, योगेश सराफ, गजानन जाधव, रामेश्वर पाटील महाले, राजू दिग्रस्कर, रवी पेंढारकर, शंकर शेंडे, नितीन पेंढारकर आदी उपस्थित हाेते.
............
ढाेलकी वाजवून वेधले नागरिकांचे लक्ष
भाजपातर्फे करण्यात आलेल्या आंदाेलनात ढाेलकी वाजविल्याने या आंदाेलनाकडे नागरिकांचे लक्ष वेधल्या गेले. आगळ्या वेगळ्या या आंदाेलनाची शहरात चर्चा हाेती.