शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

काँंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची अग्निपरीक्षा

By admin | Published: June 12, 2014 10:59 PM

लोकसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणुकीला सामोरे गेलेला रिसोड विधानसभा मतदारसंघ काही महिन्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरा जाणार आहे.

वाशिम: लोकसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणुकीला सामोरे गेलेला रिसोड विधानसभा मतदारसंघ काही महिन्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा हा मतदारसंघ स्वत:कडे कायम ठेवण्याची रंगीत तालिम काँग्रेसने एवढय़ातच केली. आता तो काँग्रेसकडून हिरावून घेण्यासाठी भाजपला शक्ती पणाला लावावी लागणार आहे. रिसोड (पुर्वीचा मेडशी) विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. १९९९ आणि २00४ च्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला, तर १९६७ पासून हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात राहिलेला आहे. २00९ च्या निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुभाष झनक चवथ्यांदा निवडून आले. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर, एप्रिल २0१४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र अमित झनक १२ हजार १0६ मताधिक्याने निवडून आले. आता आगामी निवडणुकीत ही जागा कायम राखण्याचे आव्हान काँग्रेस-राकाँ आघाडीपुढे, तर ती बळकावण्याचे आव्हान भाजप-शिवसेना युतीपुढे राहणार आहे. पुर्वीच्या मेडशी मतदारसंघातून काँग्रेसचे रामराव झनक तीनवेळा, विठ्ठलराव शिंदे व किसनराव गवळी हे एकवेळा तर सुभाष झनक हे तीनवेळा निवडून आले होते. भाजपचे विजय जाधव हे या मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले.२00९ च्या निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष झनक यांनी ५१ हजार २३४ मते प्राप्त करुन विजय मिळविला. माजी खासदार व अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी ४८१0४ तर भाजपाचे विजय जाधव यांनी ३६९४0 मते मिळवली होती. भारिप-बमसंचे उमेदवार लक्ष्मणराव कायंदे यांना ६,९७७ तर मनसेचे राजू पाटील राजे यांना ५,१३३ मते मिळाली होती. त्यावेळी झनक यांनी ३0४0 मताधिक्याने विजय मिळविला. रिसोड विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्याखालोखाल मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या आहे; परंतु या मतदारसंघात मराठा समाजाचेच उमेदवार आजवर निवडून आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे यांनी ७0,२२४ मते मिळवली. काँग्रेसचे हिदायत पटेल यांना ५0,३0५ तर भारिप-बमसंचे प्रकाश आंबेडकर यांना २८,९१९ मते मिळाली.रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक या लोकसभा निवडणुकीसोबतच झाली. एकाचवेळी झालेल्या मतदानामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांना ७0 हजार २२४ मते मिळाली, तर विधानसभेत काँग्रेसचे अमित झनक यांनी ७३,३९१ यांना मते मिळवून विजय संपादन केला. भाजपाचे विजय जाधव यांना ६१२८५ मते मिळाली. भारिप- बमसंचे किरण क्षीरसागर यांना २९,५0९ मते मिळाली. अमित झनक यांनी १२,१0६ मताधिक्याने विजय मिळवला. धोत्रेंची आघाडी त्यांच्या पक्षाच्या विजय जाधवांच्या कामी आली नाही, हे विशेष. अवघ्या काही महिन्यांनीच हा मतदारसंघ पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जाते. भाजपकडून विजय जाधव, जि.प.सदस्य श्याम बढे, राष्ट्रवादी काँग्रेसने निष्कासित केलेले शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे, विष्णुपंत भुतेकर, भारिप-बमसंकडून माजी नगराध्यक्ष किरण क्षीरसागर, मनसेकडून जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, जि.प.सदस्य विश्‍वनाथ सानप हे इच्छूक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेस स्वत:कडे राखतो, की विरोधक तो बळकवात, ते निवडणुकीच्या रणसंग्रामानंतरच स्पष्ट होणार आहे.