कारंजा लाड (वाशिम): बसस्थानकाच्या २00 मीटर परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांची पार्र्किंग करता येत नाही; मात्र अगदी बसस्थानकाच्या जवळच काळ्या-पिवळ्या उभ्या राहत आहेत. खासगी प्रवासी वाहनांची वाहतूक करणारे बसस्थानक परिसरात उभे राहून प्रवासी मिळवण्यासाठी गजर करतात. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी काळी-पिवळी, लक्झरी, अँपे यांना परवाना दिला जातो; पण पोलिसांशी विचार विनिमय करून खासगी प्रवासी वाहतूकदार आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची नियमबाह्य वाहतूक करीत आहेत. परिणामी कारंजा परिसरात अनेक अपघात घडत आहेत.
बसस्थानक परिसरात काळी-पिवळीचा ‘गजर’
By admin | Published: October 29, 2014 1:27 AM