शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

वाशिम जिल्ह्यात रक्तपेढ्या ऑक्सीजनवर; रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 11:22 AM

Blood Banks : शासकीय रक्तपेढीत आजमितीस केवळ १५२ बॅग रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

वाशिम : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय व एक खासगी अशा दोन रक्तपेढ्या कार्यान्वित आहेत. एका रक्तपेढीला महिन्याकाठी साधारणत: २५२ बॅग रक्ताची गरज भासते; मात्र शासकीय रक्तपेढीत आजमितीस केवळ १५२ बॅग रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली असून रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे. दरम्यान, लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यासंबंधी वारंवार आवाहन करण्यात येत आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही पूर्वीसारखी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली नाहीत किंवा रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्यासंबंधीची मानसिकताही अनेकांची राहिली नाही. 

शासकीय रक्तपेढीत सात दिवसांचाच साठा शिल्लकशासकीय रक्तपेढीत महिन्याला किमान २५२ बॅग रक्ताचा साठा ठेवला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण झपाट्याने खालावले असून आजमितीस केवळ १५२ बॅग रक्त उपलब्ध आहे. रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास हा साठा सात दिवसांपेक्षा अधिक काळ पुरणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

टॅग्स :washimवाशिमBlood Bankरक्तपेढी