कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गुरुमंदिर सस्थानचे अध्यक्ष नारायण खेडकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार धीरज मांजरे, रास्वचे जिल्हा सहकार्यवाहक विजय कदम, डॉ. अजयकांत, श्री गुरुमंदिरचे व्यवस्थापक प्रकाशकाका घुडे, अभयकाका पारसकर, गोलूभाऊ डहाके, शिवसेना शहरप्रमुख गणेश बाबरे, नगरसेवक प्रसन्ना पळसकर, नगरसेवक नितीन गडवाले, मनीष भेलांडे, कस्तुब डहाके, पवन डांबलकर व सरकार ग्रुपचे अध्यक्ष योगेश पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिराला भेट देण्यासाठी माजी गृहमंत्री डॉ. रणजित पाटील, सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पंकज काटोले, अविनाश खेडकर, आशिष तांबोलकर, नीलेश घुडे, अतुलभाऊ बर्डे, समीर देशपांडे, नगरसेवक अमोल गढवाले, कुणाल महाजन, अतुलदरेकर यांनी प्रमुख्याने रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदान करणाऱ्यांचे मनोबल वाढवले. यावेळी अकोला ब्लड बँक, अकोला, जिव्हाळा ग्रुप, अकोला, जिव्हाळचे रक्तदाते, श्री गुरुमंदिर रुग्णवाहिका, कारंजा याचे सहकार्य लाभले. संचालन अजिक्य जवळेकर व आभार रमेश देशमुख यांनी मानले.
कारंजा येथे १११ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:51 AM