शहीद दिनी राज्यात निमा संघटनेच्या वतीने डॉ . उदय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीस निमा संघटना तालुका अध्यक्ष डॉ. उदय चव्हाण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अभिजित कंकाळ, डॉ. राजेश देवळे, डॉ. राजाभाऊ घुगे, डॉ. नीलेश मानधने, डॉ. दीपक जाधव, डॉ. संजय लटुरिया, डॉ. पवन मानधने, डॉ. उमेश तारे, डॉ. श्याम मानधने, डॉ. खटोड, डॉ. सतीष घुगे, डॉ. सत्यनारायण भांगडिया, डॉ. अनुप संबापुरे आदींची उपस्थिती होती. या शिबिरात एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांचे रक्त गोळा करण्यासाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील चमूचे विशेष सहकार्य मिळाले. शिबिरात रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . शहरात दिवसभर पाऊस सुरू असतानाही शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिराला शहरातील मेडिकल असोसिएशन, वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संघटना, शिवराज हेल्थ क्लब, विघ्नहर्ता फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी निमा संघटना तालुका मालेगावच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
३५ रक्तदात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:41 AM