कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मध्यंतरी रक्तदानाचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने अडचणीत अधिकच भर पडली. परिणामी, गेल्या काही दिवसांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘लोकमत’ने स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते १५ जुलै या कालावधीत जिल्हाभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. याअंतर्गत ३ जुलै रोजी ड्रीमलॅण्ड सिटीमधील सेक्टर नंबर एक मधील महावीर चाैधरी यांच्या हाॅलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
.....................
कोट :
‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. आम्ही ड्रीमलॅण्ड सिटी सेक्टर १ मध्ये ३ जुलैला शिबिर आयोजित केले. त्यातही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान करावे.
- मुरलीधर उत्तरवार
..............
आजघडीला रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या रक्तदान मोहिमेचा मोठा फायदा होणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवून रक्तदान करावे.
- विजय सरप
............................
शिबिराचे वेळापत्रक
६ जुलै : लक्ष्मीविहार काॅलनी, मंगरूळपीर
६ जुलै : जि.प. सभागृह, वाशिम
८ जुलै : साबू हॉस्पिटल, वाशिम
१० जुलै : शिवाजी शाळा, रिसोड
१० जुलै : पाटणी चौक, वाशिम
१० जुलै : साई मंदिर, शेलूबाजार
११ जुलै : तहसील कार्यालय, वाशिम
११ जुलै : पंचायत समिती, कारंजा