कारंजा : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात मतदारांनी सत्ताधाऱ्यांना फटका देत कारंजा तालुक्यात नवयुवकांना संधी दिल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
२८ ग्रामपंचायतींपैकी मुरंबी ग्रामपचांयत बिनविरोध झाल्यामुळे २७ ग्रामपचांयतींच्या ९० प्रभागांसाठी ४९४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये बेंबळा, कामरगाव, खेर्डा बु. भडशिवनी, शिवनगर, माळेगाव, हिंगणवाडी, सिरसोली, राहटी,मेहा, भामदेवी, लाडेगाव, पिंप्री मोडक, मोहगव्हाण, शेवती, शेलु बु. कोळी, उबंर्डा बाजार, कार्ली, येवता, धामणी खडी, सोहळ, गायवळ, पिंपळगाव खु. गावांतील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना फटका देत नवयुवकांच्या पॅनलला विजयी केले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मतदारसंघाचे आ. राजेंद्र पाटणी यांनी १२ ग्रामपंचायतींवर वर्चस्व असल्याचे निकालावरून दिसून येते. तर माजी आमदार प्रकाश डहाके यांचे वर्चस्व १२ पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर आहे. मतदारांनी दिलेला कौल पाहता मागील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेत असणाऱ्यांना पुन्हा सत्ता न देता युवकांना जास्तीत जास्त संधी दिल्यामुळे २८ ग्रामपंचायत निवडणुकीत युवकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या निवडणुकीत आ. राजेंद्र पाटणी, माजी आमदार प्रकाश डहाके, जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती देवळे, अशोक डोगरदिवे, चदकांत डोईफोडे, तसेच पंचायत समिती माजी सभापती श्रीकृष्ण लाहे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे यांनी या निवडणुकीत कसून काम केले.
...................
काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे नेतृत्व करणारे युसूफ पुजानी यांचे वर्चस्व असणारी ग्रा. पं. या निवडणुकीत सध्यातरी दिसून येत नाही.
.............
तालुक्यातील कामरगाव व उबरडा ह्या दोन ग्रामपंचायती मोठ्या आहेत. याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष होते तर कामरगाव ग्रामपंचायतीवर भाजपा गटाचे १४ सदस्य विजयी झाले. तालुक्यातील उंबर्डा ग्राम पंचायतमध्ये समीक्ष गटाचे सदस्य विजयी झाले.