लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा तालुक्यातील लोहगाव येथील विवाहित महिलेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कारंजा पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी सासरकडील तिघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
विवाहित महिला आरती प. राठोड यांच्या तक्रारीनुसार, तुझ्या वडीलांनी हुंडा दिला नाही, असा तगादा लावुन पती व सासरकडील मंडळीने शारिरीक व मानसिक त्रास दिला. पतीने पोटातील गर्भावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे गर्भपात झाला. या गर्भपातास कारणीभूत असणा-या पती पदुम उत्तमसिंग राठोड, नणंद साधना राजु आडे, सासू गोदावरी उ.राठोड यांच्याविरुध्द भादंवी कलम ३९८, ३०४, ३१६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीची तब्येत खराब झाल्यामुळे तिला अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.