कोठारी (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथील हरिदास गणाजी ढोके (वय ५५ वर्षे) या इसमाचा मृतदेह बुधवारी रात्री उशिरा गावालगतच्या शेततळ्यातील पाण्यात आढळून आला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.हरिदास ढोके हे १२ मे पासून बेपत्ता होते. कुटूंबियांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र थांगपत्ता लागला नाही. अखेर मंगरूळपीर पोलिस स्टेशनला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गावालगतच्या परिसरात शोध घेतला असता, राहूल गवई यांच्या शेतातील शेततळ्यानजिक कपडे आणि चप्पल आढळून आली. त्याआधारे पोलिसांनी १३ मे रोजी दिवसभर शोधकार्य हाती घेतले. अखेर रात्री उशिरा शेततळ्यातून ढोके यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. याप्रकरणी गुरूदास हरीदास ढोके यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की हरिदास ढोके यांना दारूचे व्यसन जडलेले होते. दारूच्या नशेतच ते शेततळ्याजवळ जाऊन पाण्यात बुडले असावे, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
बेपत्ता व्यक्तीचा अखेर मृतदेहच आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 5:39 PM