लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील भौरद येथे शेतीच्या धुर्याचा वाद विकोपाला जात महिला-पुरुष अशा आठ जणांनी मिळून बाप-लेकावर कुर्हाडीने हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार, १५ जुलै रोजी घडली .सुरेश यशवंतराव नप्ते (रा.भौरद) यांना व त्यांच्या मुलाला शेताच्या धुर्यावरील मालकी हक्काच्या कारणावरून वाद घालत त्याच गावातील सुभाष नप्ते, रामजी नप्ते, संतोष नप्ते, जयवंतराव नप्ते यांच्यासह इतर चार महिलांनी मिळून कुर्हाड व लोखंडी टामीने मारहाण केली. यात सुरेश नप्ते आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. वैद्यकीय अहवाल व प्राप्त फिर्यादीवरुन पोलिसांनी नमूद आठही आरोपींविरूद्ध कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जायभाये करीत आहेत.
कु-हाडीने हल्ला; बाप-लेक जखमी
By admin | Published: July 16, 2017 2:12 AM