शासनाकडून सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वर्ग १ ते ८पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात येते .परंतु वर्ग ९ आणि वर्ग १०वीच्या विद्यार्थ्यांना स्वत: पुस्तक विकत घ्यावे लागतात. ही बाब हेरून आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथे १ मे २०१६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक पेढी योजना सुरू करून वर्ग १०च्या विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध करून दिले. २०१६ पासून सदर योजनेचा लाभ सातत्याने विद्यार्थ्यांना होत आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या वर्ग ९, १०वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दिनांक १८जुलाई रोजी पुस्तक वाटप करण्यात आले. पुस्तक वितरण करताना कोविड-१९च्या नियमाचे पालन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक देवीदास काळबांडे, मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर, शालिनी ओलिवकर, गोपाल काकड, अनिल हजारे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गासह पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता.