वाशिम: शिक्षणाचा अधिकार कायद्यान्वये प्रत्येकाला हक्काचे शिक्षण असतांनाच शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे कधींही न भरून निघणारे नुकसान होत आहे . जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग व मूख्यकार्यपालण अधिकारी याकडे लक्ष देताना दिसत नसल्याने अखेरीस संतप्त बोरी बु. येथील शाळा व्यवस्थापन समिती व पालकांकडून २५ सप्टेंबरला जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांना दिवसभर शाळेबाहेर थांबावे लागले. जोपर्यंत या शाळेला एक शिक्षक मिळत नाही तोपर्यंत ही शाळा बंद रहाणार आहे असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला हाेता.
बोरी बू जि. प. मराठी शाळेला तात्काळ एक शिक्षक द्या अन्यथा शाळेला कूलूप ठोकणार असल्याचा ठराव शाळा व्यवस्थापन समिती बोरी ने पारीत केला होता. त्याच्या प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना पाठविली होत्या परंतु त्यांनी कोणतेही दख्खल घेतलीं नाही यामुळे हे आंदाेलन करण्यात आले. बोरी बु. पं.स.वाशिम येथे वर्ग १ ते ५ पर्यंत वर्ग असुन येथे ३ शिक्षक कार्यरत आहेत. परंतु एक शिक्षिका . राजश्री नवले या दिनांक. ११/०८/२०२३ पासुन प्रसुती रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे शाळेत २ शिक्षक कार्यरत असुन त्यांचेकडे इतरही कामे आहेत.