मानोरा : क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने सोमवार, ३ एप्रिल रोजी सहा महिने शिक्षा व साडेतीन हजार रुपये दंड ठोठावला आहे.याबाबत सविस्तर असे की, १७ नोव्हेंबर २००८ रोजी कमलेश शिंदे (रा. सावंगी, ता. दारव्हा) हे पंचाळा धरणावर मेंंढ्यांना पाणी पाजण्याकरिता गेले असता आरोपी कैलास चव्हाण, अविनाश चव्हाण यांनी क्षुल्लक कारणावरुन त्यांना मारहाण केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कैलास आणि अविनाश चव्हाणविरूद्ध कलम ३२३, ३२५, ५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवून प्रकरण न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात साक्ष पुराव्याअंती प्रथम श्रेणी न्यायाधीश यांनी आरोपींना सहा महिने शिक्षा व साडेतीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून एम.जी.राऊत यांनी काम पाहिले व पैरवी म्हणून एनपीसी शरद राठोड यांनी सहकार्य केले.
मारहाणप्रकरणी दोघांना सहा महिने शिक्षा!
By admin | Published: April 04, 2017 1:02 AM