लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम): एका सुप्रसिद्ध सिनेमातील ‘साथ जिएंगे, साथ मरेंगे, के लोग हमे याद करेंगे’, या गाजलेल्या गितांच्या ओळी प्रत्यक्षात उतरल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना २७ नोव्हेंबरला आला. मंगरूळपीरच्या चेहेलपुरा भागात वास्तव्यास असलेले ७५ वर्षीय मो. मुनव्वर यांचा यादिवशी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला; तर त्याच्या अवघ्या ७ तासातच त्यांची ६५ वर्षीय पत्नी जमीला बी मो. मुनव्वर यांनीही अखेरचा श्वास घेतल्याची घटना येथे घडली. या दाम्पत्यांची एकत्र अंत्ययात्रा काढून दोघांवरही एकाच दिवशी एकाच दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीरच्या चेहेलपुरा भागात राहणारे मो. मुनव्वर यांचे २७ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ही वार्ता कळताच त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांनी त्यांचे घर गाठणे सुरू केले. यादरम्यान दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी जमीला बी मो. मुनव्वर यांचाही वृद्धापकाळाने अचानक मृत्यू झाला. एकाच दिवशी पती-पत्नीच्या निधनामुळे शहर तथा परिसरात हळहळ व्यक्त झाली. मुस्लिम धर्मियातील रुढी-परंपरेनुसार नमाज अदा केल्यानंतर दोघांचीही एकत्ररित्या अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच एकाच दफनभूमित दोघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.
'त्या' दोघांची एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 7:18 PM
मंगरूळपीरच्या चेहेलपुरा भागात वास्तव्यास असलेले ७५ वर्षीय मो. मुनव्वर यांचा यादिवशी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला; तर त्याच्या अवघ्या ७ तासातच त्यांची ६५ वर्षीय पत्नी जमीला बी मो. मुनव्वर यांनीही अखेरचा श्वास घेतल्याची घटना येथे घडली. या दाम्पत्यांची एकत्र अंत्ययात्रा काढून दोघांवरही एकाच दिवशी एकाच दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ठळक मुद्देपतीच्या मृत्यूनंतर अवघ्या ७ तासात पत्नीनेही घेतला अखेरचा श्वास!दोघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार मंगरूळपीर येथील घटना