- माणिक डेरे लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शाळा बंद असल्याने आॅनलाईन शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आता ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या पालकांना ‘बाबा मला शाळेला जायचं’म्हणताना दिसून येत आहे. गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी आॅनलाईन शिक्षण घेवू शकत नसल्याने काही शिक्षक विद्यार्थ्यांना आॅफलाईन शिक्षण घरोघरी जावून देत आहेत.शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी गरीब सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांला स्मार्ट फोन घेणे अशा बिकट परिस्थितीत कठीण जात आहे. आॅनलाइन शिक्षण घेता येत नाही ,त्यामुळेच बाबा मला शाळेत जायचं हो! अशी हाक विद्यार्थी आपल्या पालकांना देत आहे. वंचित राहावे लागत आहे.आजही मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील पालक हातावर आणून पानावर जेवण करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे . त्यामुळे अशा कुटुंबातील पाल्याचे काय असा सवाल पालकांना भेडसावत आहे . स्मार्ट फोन आणायचा कोठून? असा प्रश्न पालकांना पडला आहे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे सद्याच्या परिस्थितीत शैक्षणिक नुकसान होत असल्याची चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. कोरोना विषाणू गाव खेड्यात येऊन पोहचला त्यामुळे संसर्गजन्य प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिक्षणावरील वाढता खर्च मोल मजुरी करणारेी गरीब शेतमजूर , शेतकरी यांना झेपावत नसल्याचे चित्र आहे. शासनाने शाळा सुरू करण्यासाठी अद्याप निर्देश दिले नाही, त्यामुळे सर्वच शाळा बंद आहे. अशा परिस्थितीत शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातील पालक करीत आहे.
मोबाईलअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता शिक्षकांचे आॅफलाईन शिक्षणग्रामीण,गरीब कुटुंबातील मुलां जवळ स्मार्ट फोन नाही,कुणाकडे असेल तर रेंज नाही.अशा स्थितीत मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून काही शाळांचे शिक्षक प्रत्यक्ष मुलांचे घरी जाऊन त्यांना आॅफलाइन शिक्षण देत आहे.पालकांच्यावतिने त्यांचे मनोमन आभार व्यक्त केल्या जात आहेत.