प्रेस क्लब, तहसील कार्यालय, शिक्षण विभाग व पोलीस प्रसाशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ व २७ जानेवारीला हे कार्यक्रम गेल्या १९ वर्षांपासून आयोजित केले जातात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती आयोजक प्रेस क्लब मानोराच्या वतीने देण्यात आली आहे.
-------------
ग्रामपंचायत निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना मानधन अदा करा :
निवडणूक कर्मचारी यांची मागणी
मानोरा : ग्रामपंचायत निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ मानधन अदा करा, अशी मागणी निवडणूक कर्मचारी यांनी केली आहे. १५ जानेवारी राेजी ग्रामपंचायतसाठी निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अधिकारी, कर्मचारी यांनी पहिले, दुसरे व तिसरे प्रशिक्षण अशी तीनही प्रशिक्षणे पूर्ण करून प्रत्यक्ष निवडणुकीत काम केले. यांच्या या अथक प्रयत्नामुळे महाराष्टातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. परंतु निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना अद्यापपर्यंत कोणतेही मानधन मिळालेले नाही. या अगोदरसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमामध्ये त्यांना कोणतेही मानधन मिळालेले नाही. यावेळी अधिकारी व कर्मचारी मानधनापासून वंचित राहू नये याकरिता महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ मानधन अदा करा, अशी मागणी मानोरा तालुक्यातील निवडणूकमध्ये सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी केली आहे.
कोट..
निवडणूक आयोग यांच्याकडून अद्याप निधी आलेला नाही. लवकरच निधी येईल. निधी आल्यानंतर निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मानधन दिले जाईल.
संदेशकुमार किरदक
तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी, मानोरा