शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

कोरोना महामारीच्या संकटातही लाचखोरी सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:11 AM

Bribe Cases in Washim : वाशिम जिल्ह्यात गत वर्षभराच्या काळात लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार जणांना जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट सर्वत्र तीव्र झालेले आहे. वाशिम जिल्ह्यातही संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ३० हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले. असे असतानाही लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यात गत वर्षभराच्या काळात लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार जणांना जेरबंद केले. यामध्ये महसूल विभाग अग्रस्थानी आहे.प्रामुख्यासने शासकीय कार्यालयांमध्ये काम अडल्यानंतर तसेच शासकीय कंत्राटदार व इतरांची देयके अदा करण्यासाठी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जाते. अशा लाचखोरांवर कारवाई करण्यासाठी वाशिममध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहेत. गेल्या १३ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट ठाण मांडून असल्याने शासकीय कार्यालयांमधील कामकाजही तुलनेने कमी प्रमाणात सुरू आहे. यामुळे अनेकांची महत्वाची कामे अडलेली आहेत. ही कामे करण्यासाठी लाच मागणाऱ्या चार जणांवर २०२१ या वर्षात वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे.

सर्वात जास्त कारवाया वाशिम तालुक्यातलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२० आणि २०२१ या दोन वर्षात सर्वाधिक कारवाया वाशिम तालुक्यातच केल्याची माहिती समोर आली आहे. उघडकीस आलेल्या प्रकरणांमध्ये ८ पेक्षा अधिक लाचखोरांना अटक करण्यात आली असून त्याखालोखाल रिसोड, कारंजा तालुक्यातील लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचे भीषण संकटात असतानाही लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे यावरून दिसून येत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जो-तो हैराण आहे; मात्र अशाही बिकट परिस्थितीत काही शासकीय अधिकारी व कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी झालेल्या तक्रारींवरून लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने तातडीची पाऊले उचलून लाचखोरांना जेरबंद केले आहे.- एस.व्ही. शेळके उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिमBribe Caseलाच प्रकरण