वाशिम : गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी १९.९० मि.मी. पाऊस झाला असून, मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावानजीकच्या नाल्यावरील पूल खचल्याने वाहतूक प्रभावित झाली.
यंदा चार लाख हेक्टरच्या आसपास खरिपाची पेरणी झाली आहे. पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. दरम्यान गत तीन, चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांना संजीवनी मिळत आहे. गत २४ तासात जिल्ह्यात १९.९० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावानजीकच्या नाल्यावरील पूल खचून गेल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. एका बाजूने दुचाकी वाहने जाऊ शकतात; मात्र चारचाकी वाहने जात नसल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
००००
कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस
गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी १९.९० मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस रिसोड तालुक्यात ३४.५० मि.मी. तर सर्वात कमी पाऊस कारंजा तालुक्यात ७.६० मि.मी. झाला. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे.
०००००
तालुकापाऊस (मि.मी.)
वाशिम २२.७०
रिसोड ३४.५०
मालेगाव २२.२०
मं.पीर १३.१०
मानोरा १७.४०
कारंजा ०७.६०