सायन्स फेस्ट २०२०-२०२१ मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन नवीन मॉडेल तयार केले, तसेच सायन्स फेस्ट विज्ञान प्रदर्शनात मॉडेल मेकींग, पोस्टर मेंकींग व क्विज या तीन प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे उपकुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, यशंवत महाविद्यालय नांदेडचे प्राचार्य ज.मु. मंत्री,शिक्षणाधिकरी संदीप सोनटक्के आदिंची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थिनी रिधिमा देशमुख, श्वेता बुजारे यांनी पोस्टर मेंकींग मध्ये इंडीया ड्युरींग पेन्डेमिक (संसर्गजन्य रोग व भारत देश ) हे तयार करून यात प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर संचिता पाटील व आयुष देशमुख यांनी हायड्रोपॉनिक्स ( जमिनीवाचून केवळ पाण्यात वनस्पती वाढण्याची कला)यावर मॉडेल तयार करून सादरीकरण केले. तसेच धनंजय शिंदे व तनिष छित्तरका यांनी दवके क्विज स्पर्धेत सहभाग नोंदवला. तसेच विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिलीत.यामध्ये विज्ञान प्रदर्शनीत स्व. माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.यशासाठी शाळेतील प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे सहकार्य लाभले.यशासाठी शाळेचे अध्यक्ष विनायकराव जाधव यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. (वा.प्र.)
पोदार लर्न स्कूल च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:38 AM