कारंजा : तालुक्यातील गिर्डा गावातील शेतकरी राजेश गाडगे यांच्या म्हैशीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना १९ जानेवारी रोजी सोहळ काळविट अभयारण्यात घडली. त्यामुळे म्हैशीची नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी शेतकरी राजेश गाडगे यांनी वन विभागाकडे केली आहे.
दिनांक २२ जानेवारी रोजी वन विभाग, कारंजा यांच्याकडे दिलेल्या निवेदनात गाडगे यांनी माझी म्हैस २० जानेवारी रोजी आमच्या शेतामध्ये चरायला गेली असता, त्या दिवसापासून परत आलेली नाही. त्यानंतर त्या म्हशीचा मृतदेह बिबट्याने खाल्लेल्या अवस्थेत दिसून आली, असे म्हटले आहे. त्यामुळे माझी म्हैस बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याचे शेतकरी राजेश गाडगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही गाडगे यांनी वन विभागाकडे केली आहे.