शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

स्त्री रुग्णालय इमारतीची विद्युतविषयक कामे रेंगाळली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 6:14 PM

वाशिम : वाशिम येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे जवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत विद्युतविषयक कामे रेंगाळली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे जवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत विद्युतविषयक कामे रेंगाळली आहेत. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१८ मध्ये विद्युतविषयक कामांसाठी ३.४९ कोटींच्या वाढीव रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.वाशिम येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय चार वर्षांपूर्वी मंजूर झालेले असून, त्या अनुषंगाने बांधकामाला सुरूवात झाली होती. इमारतीचे जवळपास ८० टक्क्यापेक्षा अधिक बांधकाम झाले असून, वाढीव निधीअभावी विद्युत उपकेंद्र, एक्सप्रेस फिडरची उभारणी, अग्निशमन यंत्रणा, वातानुकुलीत यंत्रणा व अन्य सुविधांची कामे खोळंबली होती. उर्वरीत वाढीव कामासाठी जवळपास ३.४९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या वाढीव रकमेतून विद्युत उपकेंद्र, उच्च दाब व एक्सप्रेस फिडरची उभारणी यासाठी १.८ कोटी, अग्निशमन यंत्रणेसाठी १.७४ कोटी, लिफ्ट उभारणी (उद्वाहन) दोन नग यासाठी ५४.१७ लाख रुपये आणि वातानुकुलीत यंत्रणेसाठी ५३.१८ लाख अशी कामे प्रस्तावित आहेत. चार महिन्यानंतरही यासंदर्भात ठोस कार्यवाही नसल्याने विद्युतविषयक कामे ठप्प आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत विद्युतविषयक कामे विद्युत विभागातर्फे केली जाणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल