वाशिम : गत दाेन वर्षांपासून काेराेनामुळे पाेळा सण पाहिजे त्या प्रमाणात साजरा करण्यात आला नाही. यावर्षी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असतांनाच बैलाचा साज दुपटीने वाढल्याचे दिसून येत आहे.
--------
काय म्हणतात व्यापारी
साज विक्रीची दुकाने झाली कमी
दरवर्षी बैलांची संख्या घटत असल्याने बैलांचा साज विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. पूर्वी रस्त्यांवर दुकानांची रेलचेल राहायची.
-कृष्णा नेमाडे, साज विक्रेता, वाशिम
सुताच्या दरात माेठया प्रमाणात वाढ
पोळानिमित्त विक्रीस आलेल्या बैलांच्या साजाचे ही भाव गगनाला भिडल्याने अनेक गरीब शेतकऱ्यांनी जुनाच साज बैलावर चढवून नवीन खरेदीकडे पाठ फिरविली, तर सदन कास्तकार खरेदीसाठी मात्र गर्दी करतांना दिसून येत आहेत. सुताचे दर वाढल्याने व इतरही वस्तूंचे भाव वाढल्याने बैलांचा साज महागला आहे. - राम ठेंगळे, साज विक्रेता, वाशिम
पेट्राेलच्या भावाचा परिणाम
पोळानिमित्त बैलांचा साज व कच्चा माल इतर जिल्ह्यातून येताे. यावर्षी पेट्राेल, डिझेल दरवाढीमुळे खर्च वाढल्याने साजाचे भाव वाढले.
अभय वानखडे, साज विक्रेता, वाशिम