लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नगरपरिषदेतील कर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ईतरत्र कामात सहभागी करुन घेतल्या जात असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. परंतु, या प्रकाराची वाच्यता करुन विनाकारण वरिष्ठ अधिकाºयांचा रोष आपल्यावर नको म्हणून कोणीही काही बोलत नसले तरी आपसात मात्र कुजबूज होताना दिसून येत आहे.वाशिम शहरामध्ये स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गंत उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचाºयांसह कर विभागातील कर्मचाºयांनाही समाविष्ट करण्यात आल्याने कर विभागातील कर्मचाºयांचे कामे पेंडीग राहतांना दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्यावतिने स्वच्छता गृह, स्वच्छतेबाबबतची कामे करावयची असताना त्या कामांना कर विभागातील अधिकारी, कर्मचारी दिसून येत आहेत.तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या फाईलची तपासणी करणे सर्व्हेक्षण करण्याचे काम सुध्दा कर विभागाकडे देण्यात आल्याने कर विभागातील कामे पेंडींग राहून याचा परिणाम कर वसुलीवर दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत करवसुली ही कमी झाली असल्याचे दिसून येते. परंतु वरिष्ठांच्या आदेशापुढे अधिकारी, कर्मचाºयांसमोर कोणताच पर्याय नसल्याचे चर्चेवरुन दिसून येते.
गतवर्षिच्या तुलनेत करवसुलीचे प्रमाण कमीकरवसुली व्हावी याकरिता मोठया प्रमाणात जनजागृती करुन दरवर्षी करवसुलीला प्राधान्य दिल्या जाते. यावर्षी आता नोव्हेंबर महिन्यापर्यंत जवळपास ५ कोटी रुपयांची करवसुली झाली होती. यावर्षी करवसुलीचा आकडा ४ कोटी रुपयाच्या घरातच असलयाची माहिती आहे. हा सर्व परिणाम कर विभागातील कर्मचाºयांवर लादलेल्या इतरत्र कामामुळे असल्याची चर्चा नगरपरिषद परिसरात दिसून येत आहे.
कायमस्वरुपी मुख्याधिकाºयांची प्रतिक्षाकाही महिन्याआधी मुख्याधिकारी वसंत इंगोले सेवानिवृत्त झालेत. ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी दिपक मोरे यांना प्रभार देण्यात आला आहे. मोरे हे प्रभारी असल्याने अनेक कामे होत नसल्याची ओरड होत आहे. वाशिम नगरपरिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविले आहेत.