वाशिम : जिल्हयातील आगाराच्या बसेसची मोठया प्रमाणात दुरावस्था झाल्याने केव्हा , कुठे बंद पडेल याचा नेम नाही. वाशिम येथे येणाऱ्या पुसद आगाराची बस १६ मार्च रोजी बंद पडल्याने तीला धक्का देण्याची वेळ दुपारी २ वाजता बसस्थानक चौकाजवळ घडली.वाशिम आगारातील बसेसची दुरावस्था त्यात मंगरुळपीर आगाराच्या बसेस अतिशय नादुरुस्त असल्याने त्या आगारात दररोज एक ना एका गाडीला धक्का देवून सुरु करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. १६ मार्च रोजी पुसद आगाराची एम.एच. ४० - ८९६० क्रमांकाची बस बसस्थानक काही अंतरावर असतांनाच बंद पडली. चालकाने बस सुरु करण्याचा प्रयत्न केला असता न झाल्याने अखेर नागरिकांना धक्का देण्याची वेळ आली होती. बसस्थानक चौकानजिकच बस बंद पडल्याने वाशिम येथे उतरणारे प्रवासी उतरुन निघून गेले. यावेळी बसला धक्का देण्यासाठी चालक व वाहकाला आजुबाजुच्या लोकांना बोलाविण्याची वेळ आली . रस्त्याचय मधातच बस बंद पडल्याने बराच वेळ वाहतूक पण विस्कळीत झाली होती. नेहमीच बसेस बंद पडण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून बसेस दुरुस्त करण्यची मागणी प्रवाशी वर्गातून केल्या जात आहे.
तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडली बस
By admin | Published: March 17, 2017 1:31 PM