वाशिम : शहरातील पाटणी चाैकामध्ये सर्वाधिक वर्दळ राहत असून, वाहनचालक आपली वाहने सर्व नियम धाब्यावर बसवून चालवीत असल्याने या वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे, असा प्रश्न पादचाऱ्यांना पडला आहे.
शहरातील सर्वांत माेठा व गजबजलेला चाैक म्हणजे पाटणी चाैक. या चाैकातून दरराेज हजाराे नागरिक कामानिमित्त ये-जा करतात. या रस्त्यावर सर्व प्रकारची दुकाने, भाजीबाजार असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ दिसून येते. वाहनांच्या गराड्यातून पायी चालताना पादचाऱ्यांना माेठी कसरत करावी लागते.
--------
पायी चालताना कसरत
वाहतुकीचे काेणतेही नियम वाहनचालक पाळत नसल्याने जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागताे. कधी काेणता वाहनचालक धडक देईल, याचा नेम नाही, अशी भीती नेहमीच राहते.
-ओम कव्हर, वाशिम
पायी चालायची भीती
वाहन चालविताना वाहनचालकांना नेहमीच जाण्याची घाई दिसून येते. भरधाव वेगाने वाहन चालत असल्याने रस्ता पार करताना भीती वाटते.
-संताेष इंगळे, वाशिम
वेळाेवेळी कारवाई
शहरातील पाटणी चाैकात माेठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने येथे दरराेज कर्मचारी असतात. वेळाेवेळी वाहतूक नियम ताेडणाऱ्यांवर कारवाई केली जाते.
-नागेश माेहाेड,
शहर वाहतूक शाखा, निरीक्षक, वाशिम
----------
रोज लाखोंची ये-जा
वाशिम शहरातील हा सर्वांत महत्त्वाचा चौक. या चौकातून बहुतांश नागरिकांना एकदा तरी ये-जा करावीच लागले. मात्र, येथे वाहतुकीचा पूर्ण बाेजावरा उडालेला असताे.
फुटपाथ कागदावरच
पाटणी चाैक ते आंबेडकर चाैकाच्या पुढे शिवाजी शाळेसमाेर फुटपाथ आहे. या फुटपाथवर सर्व लघु व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. हे फुटपाथ केवळ नावापुरते असून, कागदावरच आहेत. प्रत्यक्षात येथे अतिक्रमण झाले आहे.
अतिक्रमण हटाव
केवळ दाखवायलाच
शहरातील रस्त्यावर फेरीवाल्यांनी, भाजीपाला व्यावसायिकांनी माेठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. वर्षातून एकदा नागरिकांना दाखवायला अतिक्रमण काढले जाते. ते पुन्हा काही कालावधीतच ‘जैसे थे’ होते.